२० लक्ष १४ हजार रुपयाचा सडवा मोहापास केला नष्ट

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : पोलीस अधिक्षकांना आलेल्या तक्रारीची त्यांनी दखल घेत तिरोडा शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या मोहफुलाच्या दारु अड्डयावर धाड टाकून तब्बल २० लक्ष १४ हजार रुपयाचा सडवा मोहापास नष्ट केला. तसेच याच अवैध दारु विक्रेत्यांनी केलेले तीन अवैध अतिक्रमण सुद्धा काढण्यात आले.तिरोडा येथील संत रविदास वार्ड येथे मोठ्या प्रमाणात अवध्यैरित्या मोहफुलाची दारू काढण्यात येऊन विक्री होत असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे अनेक तक्रारीवरून आज दिनांक ७ जुलै रोजी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबाडे, पोलीस उपनिरीक्षक विघ्ने, पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक सायकर, हवालदार हलमारे, निरंजन कोडापे, बिसेन, शेख, तुरकर, केदार, पोलीस शिपाई रहांगडाले, महिला पोलीस शिपाई तोडरे यांचे सह तिरोडा पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, अभिजीत जोगदंड, हवालदार नितेश बावणे, योगेश कुळमते, नीलकंठ रक्क्षे, शिपाई शैलेश दमाहे, सूर्यकांत खराबे, इरफान शेख, महिला शिपाई भूमेश्वरी तेराले, यांनी केलेले धडक कार्यवाहीत संत रविदास वार्ड येथील कलीम गफुर खा पठाण ,तौसीफ सलीम खा पठाण, अमीन सफी शेख, साबीर रहीम खा पठाण, अकिल रहीम खापठाण, चंद्रशिला श्रावण कनोजे, संजय अशोक बरीयेकर, शीला विनोद खरोले, दिलीप घनशाम बरीयेकर, ललिता मनोज बरीयेकर, सुरज प्रकाश बरीयेकर,सुखवता बरीयेकर, भूपेंद्र माणिक बरीयेकर, वंदना धर्मेंद्र जगणे ,दिलीप घनश्याम बरीयेकर, ललिता मनोज बरीयेकर या अवधैरीत्या दारू गाळून विक्री करणा-यांवर कार्यवाही करत त्यांचे कडून ४८७ प्लॅस्टिक पोतडीत मोह फुलाची दारू गाळण्याकरिता ठेवलेला १९ हजार ४८० किलो सडवा मोहापास किंमत २० लक्ष १४ हजार रुपये जप्त करून नष्ट केला तसेच येथे काही अवैध दारू गाळणाºयांनी अवैधरित्या केलेले अतिक्रमणही तिरोडा नगर परिषदेचे कर विभाग प्रमुख ऋतूनजय कांबळे, आरोग्य विभाग प्रमुख सतीश तांदूळकर संजय नागपुरे, अंकुश खोब्रागडे, मनोज लारोकर, धनपाल नागपुरे यांचे पथकाने जेसीबी द्वारे जमीन दोस्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे या मोठ्या कार्यवाहीमुळे तिरोडा तालुक्यातील अवैध व्यावसायिकांना धडकी भरली असून तालुक्यातील इतरही पोलीस स्टेशन परिसरात अशी कार्यवाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *