नागपुरातील मेयो रुग्णालयाच्या वार्डात आग

नागपूर : नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) वार्ड क्रमांक ३४ मध्ये मंगळवारी दुपारी आग लागली. वार्डात धूर पसरल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली. वेळीच कर्मचायांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे रुग्णांचा जीव भांड्यात पडला. मेयो रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, अस्थिरोग विभागाच्या वार्ड क्रमांक ३४ मध्ये डॉक्टरांची वेगळी खोली आहे. या खोलीत शॉर्ट सर्किट झाल्याने तेथे आग लागली. वार्डात धूर शिरल्याने नातेवाईकांत पळापळ झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *