जिल्ह्यात विजेचे तांडव; दोन ठार,२४ जखमी

विजेच्या धक्क्याने एक गंभीर २१ जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी :- जिल्ह्यात खरीप हंगाम जोरात सुरू असून शेतावर मजुरांची व शेतकºयांची लगबग सुरू आहे शेतावर विज कोसळल्याने विजेच्या धक्क्याने २१ जण जखमी तर एक गंभीर झाल्याची घटना दुपारी एक वाजता पवनी तालूक्यातील चिचाळ शिवारात घडली गंभीर ज्योती काटेखाये (३०) यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तर जखमी २१ जणांना ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे उपचार सुरू आहे. भंडारा जिल्हा हा भारताचा जिल्हा म्हणून ओळखला जातोजिल्ह्यात धडकेत रोहिणी यंगामाला सुरुवात झाली असून जिल्हा गेल्या दोन दिवसापासून रेड झोन म्हणून घोषित केला आहे त्या अनुषंगाने मुसळधार पाऊस चे हजेरी लावत आहे

शुक्रवार ला दुपारी १ वाजता चिचाळ शेतशिवारात विज कोसळल्याने ज्योती काटेखाये (३०) ही गंभीर जखमी झाल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले तर श्रीकृष्ण काटेखाये (५०) छाया बिलवणे (३४) कविता मोहरकर (३२) रूपचंद बिलवणे (३५) देवचंद बिलवणे (४०) ज्ञानेश्वर बिलवणे (५५)विजय मोहरकर (४०) प्रमिला काटेखाये (३२) दीपमाला बिलवणे (३०) रुखमा बिलवणे (५५ )संगीता नखाते (३५) शालू भुरे (४८) गीता बिलवणे (२८) राजू मोहरकर (३०) सुषमा बिलवणे (३८)सुनिता मोहरकर (३०) सुनीता बिलवणे (३८) ज्योत्सना मोहरकर (३०) रज्जु मोहरकर (३०) प्रियंका बिलवणे (३१) राणी काटेखाये (३१) विक्कीबिलवणे (२८) हे प्रकृती जखमी असल्याने यांना ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे भरती करण्यात आले. घटना स्थळाला पवनीचे तहसीलदार महेंद्र सोनोने, मंडळ अधिकारी दिलीप कावटे सरपंच शिवशंकर मुंगाटे ,सरपंच चिचाळ मधुसुदन काटेखाये उपसरपंच जगतराम गभणे व तलाठी संदिप मोटघरे,बिट जमादार सुभाष मस्के यांनी पंचनामा केला आहे.अचानक झालेल्या घटनेने त्याचे कुटूंबावर दु:खाचे डोंगर कोसळल्याने शासनाकडून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी जनतेने मागणी केली आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *