सोसाट्याच्या वाºयाने शेतावरील सोलर उडाले…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शेतकºयांना वरदान ठरणाºया व सिंचनासाठी उपयुक्त ठरणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप पॅनल योजने अंतर्गत मोहाडी तालुक्यातील टाकला येथे गेल्या दोन वर्षापुर्वी येथिल अल्पभूधारक शेतकरी संतोष दशरथ भोयर यांनी आपल्या शेतावर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पॅनल व कुसुम पंप योजने अंतर्गत अनूदानावर शेतावरील विहिरीवर कृषी सौर पॅनल व मोटर पंप बसविण्यात आले होते.

सदर सौर कृषी पंपा द्वारे शेती सिंचन करीत होते. पंरतु २६ जुलै रोजी जिल्ह्यात जोरदार चक्रीवादळ सोसाट्याच्या वाºयासह पावसाने हजेरी लावली असता सदर सोसाट्याच्या वारा व जोरदार पावसात टाकला येथिल संतोष दशरथ भोयर या शेतकºयांच्या शेतावरील महागडे सौर कृषी पंप योजनेचे सौर पॅनल पुर्णत: जमिनीपासून उखडुन ईतरत्र उडाले असल्याने सदर पॅनल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परीणामी शेतकरी संतोष भोयर यांच्या समोर ऐन पावसाळ्यात शेती सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच आता भात रोवणीचे काम सध्या प्रगती पथावर असुन ऐन रोवणीच्या वेळी चक्रीवादळात सौर पॅनल उडाले असुन त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी भोयर या़ंच्यावर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाच्या संबधित विभागाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप पॅनल योजने अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकरी संतोष भोयर यांना नुकसान भरपाई देवुन सदर पॅनल नव्याने बसविण्यात यावे अशी मागणी शेतकरी स़तोष भोयर यांनी निवेदनातुन केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.