तीन अभियंत्यांवर शहर विकासाचा भार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहराची लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या घरात आहे. शहरवासींना मुलभूत सोयीसुविधा पुरविणे व शहराच्या विकास कामांची जबाबदारी येथील नगर परिषद प्रशासनाची आहे. मात्र, नगर परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला रिक्त पदाचे ग्रहण लागले असून येथील अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. केवळ ३ अभियंत्यांच्या खांद्यावर शहराच्या विकास कामाचा भार लादण्यात आलेला आहे. त्यामुळे शहराच्या विकास कामांचा आराखडा वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गोंदिया नगर परिषदेची लोकसंख्या १ लाख ३१ हजार आहे. मात्र सध्या ही दोन लाखांवर पोहोचली आहे. सुमारे पाच किमी दूरवर गोंदिया शहर वसलेले आहे.

नगर परिषदेचे २२ प्रभाग आहेत. या प्रभागाच्या विकासाची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर आहे. दरम्यान नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंताची ७ पदे मंजूर असताना केवळ ३ अभियंते कार्यरत आहेत. कामाचा व्याप अधिक असल्याने ३ अभियंत्यांना शहराच्या विकास कामांचा आराखडा वेळेत तयार करता येत नाही. विकास कामे रखडली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नव्याने एकही विकास कामे झाली नाही. मात्र, शासनाने पद भरण्यासाठी मुहूर्तच काढला नाही. तर सध्या कार्यरत असलेल्या तीन अभियंत्यांपैकी एक अभियता येत्या ३ ते ४ महिन्यात सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर संपूर्ण शहराचा भार दोनच अभियंत्यांवर राहणार आहे. मात्र याकडे शहराच्या विकासाच्या बाता करणाºया लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. याचा फटका मात्र शहरवासीयांना बसत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.