कुपोषित बालकांना उपचारासाठी करावा लागतो महिने-महीने वेट अ‍ँड वॉच..

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : धक्कादायक… कुपोषणाचा डाग पुसून काढण्यासाठी सरकारने पुनर्वसन पोषण केंद्र सुरू केले आहेत. गोंदियात बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयातून हे केंद्र चालविले जात आहे. मात्र, पुरेशा सुविधा नसल्याने कुपोषित बालकांना औषधोपचारासाठी किंबहुना सेवेचा लाभ घेण्यासाठी वेटींगवर राहावे लागत आहे.नक्षलग्रस्त गोंदियात आरोग्य व्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले आहेत, याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या काही कमी नाही. ही संख्या कमी नव्हे, तर कुपोषणाचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना आखल्या गेल्याआहेत. त्यानुसार, सरकारकडून योग्य उपचार व देखभाल केली जाते. काही कुपोषित बालकांचे वजन इतके कमी असते की, त्यांना पोषण आहार तसेच माता-पित्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते. कमी वजन असलेल्या कुपोषित बालकांचे वजन वाढविण्याच्या उद्देशाने येथील बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्र २०११ मध्ये सुरू करण्यात आले. या पोषण पुर्नवसन केंद्रात फक्त १० मुलांची भरती करण्याची सुविधा उपलब्ध आहे. बालके भरती झाल्यास त्यांना १४ दिवस भरती राहावे लागते. त्यामुळे दररोज १० ते १५ कुपोषित बालकांना भरती न करताच परतावे लागत आहे. काहींना वेटींगवर दोन ते तीन दिवस राहावे लागत आहे. परिणामी, वेळेवर मार्गदर्शन व पोषण आहार न मिळाल्यामुळे कुपोषित मुलांच्या संख्येत वाढ होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.