महापारेषणमध्ये ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत ‘पंचप्रण शपथ’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत महापारेषणमध्ये आज (दि.९) सकाळी दहा वाजता महापारेषणच्या सांघिक कार्यालय व राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयात पंचप्रण शपथ घेण्यात आली. वांद्रे येथील प्रकाशगंगा इमारतीत महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांनी भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करु. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करु. देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करण्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु ही पंचप्रण शपथ उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाºयांना दिली. तसेच महापारेषणच्या महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या कार्यालयात मुख्य अभियंता यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाºयांना पंचप्रण शपथ दिली.

याप्रसंगी मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. सुधीर वानखेडे, मुख्य अभियंता श्री. पीयूष शर्मा, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्रीमती अंजू गुप्ता, महाव्यवस्थापक (मा.सं. आस्थापना) श्री. राजू गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. त्र्यंबक ढेंगळे, श्री. संजीवकुमार बड्डेला, श्री. सचिन खडगी, सहायक महाव्यवस्थापक श्री. महेश सावंत, श्री. इमामभाई सिद्दीकी, श्री. महेश आंबेकर उपस्थित होते. ांत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा बुधवारपासून सुरु झाला. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ह्यमिट्टी को नमन, वीरों का वंदन या घोषवाक्यासह देशभर आयोजित ह्यमेरी माटी-मेरा देश या अभियानाची सुरुवात झाली आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.