सोमलवाडा/मेंढा येथे क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण व महामानवांना वंदन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील मौजा सोमलवाडा येथे आज ९ आॅगस्ट क्रांती दिना निमित्त स्वातंत्र्य संग्रामातील सर्व हुतात्म्यांना वंदन करून तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोकनायक क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून क्रांतीदिन व जागजिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मान्यवर म्हणुन मेंढा येथील नवनियुक्त पोलीस पाटील सौ.निलीमा सोपान उईके, पाणी वापर संस्था सोमलवाडा अध्यक्ष माणीकभाऊ टिचकुले ,सरपंच सौ. ममता टिचकुले, श्री. हेमंतभाऊ अतकारी माजी सरपंच, सौ.अनुसयाबाई उईके, अनुरताबाई धुर्वे, रेणुकाबाई उईके, कमलाबाई उईके, सुमीत्राबाई उईके, सोपानभाऊ उईके,सौ.प्रमिला भलावी, ज्ञानेश्वर वघरे, सुनिल धुर्वे,सुर्यभान भलावी, शिशुपाल धुर्वे,संतोष धुर्वे, गिरीधर कुंभरे तसेच गावातील नागरीक यांच्या प्रमुख उपस्थितीत गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.