१० दिवसाच्या विश्रांती नंतर रेती माफीयांनी पुन्हा काढले डोकेवर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : लोकसभा निवडणुक व आचारसंहितेचे भेदन आणी १० ते १२ दिवसाची विश्रांती घेत रेत माफियांनी पुन्हा आपले डोकेवर काढले असल्याचे वृत्त पुढे आले आहे. रेतीची चोरटी वाहतूक पुन्हा धडाक्यात सुरू झाली आहे. सोंड्या, वारपिंडकेपार, महालगाव व मांडवी शेत शिवारात पुन्हा डम्पिंग सुरू झाली आहे. रॉयल्टीच्या नावाखाली रेतीच्या ढिगाºयावर ढिग रचले जात असल्याचे सांगितले जात आहे. दहा ते बारा दिवसापूर्वी पोलीस प्रशासन, महसूल विभाग व मायनिंग अधिकारी यांच्या संयुक्त कार्यवाहीने ठिकठिकाणच्या रेती घाटावर कारवाई करण्यात आली होती. यात पोलीस उपविभागीय अधिकारी रश्मीता राव यांनी केलेल्या कार्यवाहीत ७ ट्रॅक्टरच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल करून ३५ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता तर खणीकर्म व महसूल अधिकारी यांच्या कारवाईत ४ ट्रक व १ ट्रॅक्टरवर कारवाई करित ८५ लाख ३७ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता. ही कारवाई २१ व २२ मार्चच्या दरम्यान करण्यात आली होती हे येथे उल्लेखित आहे.

वरील कारवाईमुळे रेती माफीयांचे चांगलेच धाबे दणाणले होते. कायदा व सुव्यवस्थेची प्रसंशा केली जात होती. रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर बंद होते. सर्व काही शांततेत सुरू असतांनाच कोणत्या राजकीय रेती माफियांची दृष्ट लागली की दहा ते बारा दिवसांच्या विश्रांती नंतर लगेच रेती माफीयांनी पुन्हा डोकेवर काढले आणि आज कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. नदी काठावर रॉयलटिच्या नावाखाली रेतीच्या ढिगावर ढिग रचले जात आहेत. जप्तीच्या रेतीची रॉयल्टी काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रेती संपता संपेना असे चित्र नदी काठावर दिसत आहे. गोबरवाई फाटा हा रेती माफीयांचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *