चारचाकी गाडीवर पडला झाड; सुदैवाने जिवीतहानी टळली

सिहोरा : बालाघाट वरून नागपूर कडे जात असलेल्या ्रॅचारचाकी गाडी क्रं. एम पी ५०/झेए ८१३३ वर एकाएकी झाड कोसळला व जागीच गाडी थांबली. ही घटना आज दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान तुमसर बपेरा राज्य मार्गावर रनेरा येथील पेट्रोल पंप लगत घडली. चारचाकी गाडीवर झाड पडला परंतु जीवहानी झाली नाही. मात्र गाडीत बसणाºयांना किरकोळ जखमा झाल्या. त्यावेळी पावसाच्या सरी जोरात सुरू होत्या. झाड पडल्यामुळे दोन्ही बाजूने एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाहता पाहता लोकांची गर्दी एकत्र जमली होती.

घटनेचे वृत्त कळताच सिहोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी यांनी आपल्या पोलीस तात्यासह घटनास्थळ गाठले. तडका फडकी क्रेन बोलावण्यात आले व झाड कापणाºयांनाही पाचारण करण्यात आले होते. व सदर मार्ग लगेच मोकळा करण्यात आला. व जखमींना प्राथमिक उपचारासाठी सिहोरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी ठाणेदार निलेश गोसावी यांच्यासोबत ट्राफिक पोलीस सतीश सार्वे, महेश गिºहेपुंजे, राजू साठवणे व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.