लांडग्याच्या हल्ल्यात एक शेळी व बोकड ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : पहाटेच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेल्यांवर हल्ला चढवीत एक बोकड व एक शेळी ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली. सदर घटना १० आॅगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील नांदेड येथे उघडकीस आली. तुलाराम ढेकलु बावनकर असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, घटनेतील पशुपालक शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करीत आहेत. दरम्यान, घटनेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास काही लांडग्यांनी गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवीत एक शेळी व एक बोकड ठार केले पशुपालक पहाटे ३ वाजताच्या सुमारास उठून गोठ्याकडे गेले असता त्यांना शेळी व बोकडाचा फडशा पडलेला दिसला. या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली. मिळालेली माहितीनुसार लाखांदूर वन विभागाचे वनरक्षक जी.डी.हत्ते यांनी घटनस्थळ गाठून घाटांचा पंचनामा केला. या घटनेत तुलाराम बावनकर नामक पशुपालक सुमारे २० हजार रुपयाचे नुकसान झाले असून पशुपालकासह ग्रामस्थांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *