बावनकुळे यांची डॉ. प्रशांत पडोळे यांच्या घरी सदिच्छा भेट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील कुणबी तसेच बहुजन समाजाचे नेते म्हणून स्वर्गीय यादवरावजी पडोळे साहेब यांचे नाव होते. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील त्यावेळी गरजू व गोरगरीब जनतेची तळागाळात जाऊन सेवा केली. बहुजनांच्या हाताला काम देण्याचे कार्य त्यावेळी त्यांनी केले. भंडारा जिल्ह्यात किसान दुग्ध संघ, जिल्हा बँक यांचे नेतृत्व केले. विविध पदावर कार्यरत त्यावेळी होते. सहकार महर्षी स्वर्गीय यादवरावजी पडोळे साहेब यांचे मुले डॉ.प्रशांत पडोळे , विवेक पडोळे आहेत. तेही त्यांच्या परीने समाजाची सेवा करीत आहेत. वडिलांनी केलेल्या समाज सेवेची आठवन ठेवत स्वत: डॉ.प्रशांत पडोळे, विवेक पडोळे जनतेची सेवा करीत आहेत. स्वर्गीय यादवरावजी पडोळे मेमोरियल हास्पिटल, अँड क्रिटिकल केअर सेंटर या नावाने मोठे हास्पिटल भंडारा येथे डॉ.प्रशांत पडोळे यांनी उभारणी करून जनतेची अविरत सेवा करीत आहेत.

समाज सेवेची तळमळ डॉ.प्रशांत पडोळे मधे आहे. शनिवार दिनांक २६ आगस्ट २०२३ ला भंडारा येथे जनसंवाद यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा जिल्ह्यात जनसेवेसाठी प्रसिद्ध डॉ.प्रशांत पडोळे यांच्या सहकार नगर भंडारा येथील निवासस्थानी जाऊन सहकार महर्षी स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्य सदिच्छा भेट घेतली. स्व यादवरावजी पडोळे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण, दीपप्रज्वलन करण्यात आले. पडोळे कुटुंबाची भेट घेतली. सहकार महर्षी स्वर्गीय यादवरावजी पडोळे साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकले, जुन्या व नवीन आठवणींना उजाळा दिला. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

भेटी दरम्यान मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याचे यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पुस्तक भेट दिली. भंडारा जिल्ह्यात जनसेववेसाठी प्रसिद्ध असलेले डॉ.प्रशांत पडोळे यांच्या भंडारा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. सुनिल मेंढे, माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, महामंत्री प्रशांत खोब्रागडे, जि.प.सदस्य विनोद बांते, श्रीमती शोभा यादवरावजी पडोळे, डॉ.प्रशांत पडोळे, डॉ.प्रांजली पडोळे, विवेक पडोळे, रुतुजा पडोळे, रिधिमा पडोळे, शार्दूल पडोळे, शिवाय पडोळे, भंडारा बावणे कुणबी समाज सेवा मंडळ अध्यक्ष सदानंद इलमे, कार्याध्यक्ष धनराज झंझाळ, युवा समिती अध्यक्ष उमेश मोहतुरे, संचालक सुर्यकांत इलमे, अनुप ढोके, अजित आस्वले, क्रीष्णा उपरिकर, गोपाल ढोकरीमारे, डॉ. प्रविन सावरबांधे, डॉ.रोकडे, अँड.संतोषसिंग चव्हान, डॉ.हेमंत जांभुळकर, विक्की सार्वे, प्रशांत डोनारकर, नेहाल भुरे, हरीचंद्र बाभरे तसेच कुणबी समाजातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *