आकर्षक राख्यांनी सजली शहरातील बाजारपेठ

गोवर्धन निनावे भंडारा : अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या राखी पौर्णिमेनिमित्त भंडारा शहरातील बाजारपेठ विविध आकर्षक राख्यांनी सजली आह़े यंदाच्या वर्षी राख्यांना जीएसटीतून (सेवा कर) वगळण्यात आले असल्याने सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े श्रावण महिन्यातील दुसरा आणि नागपंचमीनंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण शुध्द पौर्णिम अर्थात नारळी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या सणाबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जात असल्या तरी बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याच्या उद्देशानेच सर्वत्र हा सण साजरा केला जातो. भावा बहीणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून बहिण भावाच्या हातामध्ये राखी बांधते. त्यामुळे या सणाला सर्वात जास्त महत्त्वाची असणारी राखी शहरात अनेक ठिकाणी उपलब्ध झाली आहे. रेशमी गोंड्यापासून सोन्या चांदीच्या ब्रेसलटपर्यंत पाच रुपयांपासून पंचवीस हजारांपर्यंत अनेक प्रकारच्या राख्या शहरात विक्रीसाठी दुकानांमध्ये सजल्या आहेत. विविध दुकानांबरोबरच गांधीचौक, पोस्ट आॅफिस चौक, राजीव गाधी चौक तसेच मोठ्या बाजार परिसरात राख्यांच्या स्टॉल्सवरही व्हेरायटी पहायला मिळत आहे.

लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्टुन्सच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. ओवाळण्यासाठी तबक आणि चॉकलेट्ससह मिठाईची व्हेरायटीही मोठ्या प्रमाणावर शहरातील विविध दुकांनामध्ये उपलब्ध आहे. अँग्री बर्डस व झू.. झू लहान मुलांसाठी उपलब्ध असलेल्या कार्टुन्सच्या राख्यांमध्ये यंदा खास आकर्षण ठरल्या आहेत त्या अँग्री बर्डस व झू झू च्या राख्या. याबरोबरच छोटा भीम, फ्रेंड गणेशा, हनुमान यांचे चित्र असलेल्या राखी खरेदीलाही प्राधान्य मिळत आहे. मिकी माऊस, व्टिटी, डोरेमॉन, पोकेमॉन यांची चित्रे असलेल्या राख्याही उपलब्ध आहेत. आॅफर्सची भेट रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी देण्यासाठी काही ना काही भेटवस्तू खरेदी होणारच हे लक्षात घेऊन शहरातील साडी दुकानांपासून विविध ब्रँडेड शोरुम्समध्ये डिस्काऊंट आॅफर्स देण्यात आल्या आहेत. शहरात मुख्य चौकांमध्ये राख्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटलेली आहेत़ देवराख्यांसह विविध प्रकारच्या आकर्षक ‘ऐंब्रॉयडरी’ असलेल्या राख्यांना मागणी वाढली आह़े आधुनिक युगातदेखील नाविन्यपूर्व राख्यांच्या गोतावळ्यात पारंपारिक रेशमी राख्यांना तेवढीच पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़े यंदा जीएसटीतून राख्या वगळल्या असल्याने साधारणत ४० ते ५०० रुपये डझनर्पयत राख्यांची विक्री करण्यात येत आह़े याला ग्राहकांची पसंती मिळत आह़े लाईट असलेल्या तसेच म्यजिकल राख्यांनाही मोठी मागणी वाढली आह़े

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *