जिल्ह्यातील चारही विधानसभा व भंडारा-गोंदिया लोकसभा काँग्रेसच लढणार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : ३ ते १२ सप्टेंबर दरम्यान काँग्रेस तर्फे काढण्यात येणारे जनसंवाद यात्रेची माहिती देण्यास काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी तिरोडा येथे येणार असल्याने काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची सभा तर जिल्हाध्यक्ष बनसोड यांचे घरी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे संदेश वाटसप ग्रुपवर आले मात्र पत्रकार परिषदेचे वेळ व जागा बदलण्यात आली वेळेची माहिती देण्यात आली मात्र जागा बदलण्यात आल्याची माहिती न दिल्याने काही पत्रकारांना पत्रकार परिषदेला हजर राहू शकले नाही तर पत्रकार परिषदेचे स्थानी पत्रकारांची तसेच कार्यकर्त्यांची ही साधी पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्याने स्थानिक पदाधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ही परिस्थिती ओढवली अशी कुजबूज उपस्थित कार्यकर्ते करीत होते.

काँग्रेस द्वारे देशातील काही राज्यात भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती या यात्रेमुळेच कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाल्याचा समज काँग्रेस पक्षात असल्यामुळे अशीच यात्रा राज्यात काढण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाचे सृष्टीने घेतला असून तीन ते बारा सप्टेंबर पर्यंत राज्यात ही यात्रा निघणार असून नागपूर विभागात वर्धा जिल्ह्याचे आष्टी ह्या शहीद गावातून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे नेतृत्वात ही यात्रा निघणार असून दररोज २५ किलोमीटर पायी चालवून जनसामान्यासी चर्चा व सभा यायचे दरम्यान ठेवण्यात येणार असून या यात्रेची माहिती देण्याकरिता २८ आॅगस्ट रोजी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे,प्रदेश सचिव जिया पटेल, प्रसन्न तिडके, वरिष्ठ पत्रकार बाळा कुलकर्णी, प्रदेश प्रतिनिधी राजू पालीवाल हे येणार असल्याने काँग्रेस भवन तिरोडा येथे संध्याकाळी ४.३० वाजता कार्यकर्त्यांची सभा व ६ वाजता दिलीप बनसोड यांची निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केल्याचे व्हाट्सअप वर संदेश पाठवण्यात आले मात्र वरिष्ठ नेत्यांचे वाहनासमोर कोहमारा गोंदिया रस्त्यावरील हिर- डामाली जवळ रान डुकराचे कळप आल्यामुळे वाहनास अपघात झाल्याने वरिष्ठ पदाधिकाºयांना येण्यास वेळझाल्याने पत्रकार परिषदेची वेळ ६ ऐवजी ७:४५ करण्यात आली मात्र पत्रकार परिषदेचे स्थान बदलण्याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही

यावरून काही पत्रकार दिलीपभाऊ बनसोड यांचे निवासस्थानी पोहोचले मात्र तेथे शुक शुकाट असल्याने परत गेले तर काही पत्रकार काँग्रेस भवन येथे गेल्याने रात्री आठ दरम्यान कार्यकर्त्यांची सभा संपल्यानंतर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे,जिया पटेल, प्रसन्न तिडके,बाळा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दिलिप भाऊ बनसोड, प्रदेश प्रतिनिधी राधेलाल पटले,शहर अध्यक्ष पवन मोरे, तालुका अध्यक्ष रमेशभाऊ टेंभरे यांचें उपस्थितित पत्रकार परिषद घेण्यात आली यात जनसंवाद यात्रेबाबत प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी माहिती देऊन तीन दिवस नानाभाऊ पटोले हे गोंदिया भंडारा जिल्ह्यात यात्रेदरम्यान राहणारा असून पुढील निवडणुका महाविकास आघाडीत लढवणार असून गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा व भंडारा गोंदिया लोकसभा काँग्रेस पक्षात लढवून विजयी होणार असल्याचा विश्वास नाना गावंडे यांनी दाखवला असून या पत्रकार परिषदेत किंवा पत्रकार परिषदेनंतर पत्रकार तसेच कार्यकर्त्यांकरता साधी पिण्याचे पाण्याचीही व्यवस्था नसल्याने पत्रकार व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असता येथे उपस्थित काही कार्यकर्त्यांनी येथील स्थानिक पदाधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याने चहा पाण्याची किंवा पत्रकार परिषदेचे स्थान बदलण्याची माहिती देण्यात आली नसावी अशी कुजबुज होत होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *