अवैधरित्या वाहतूक होणाºया ३४ गोवंशाची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व नवेगावबांध पोलिस ठाणे यांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ९ सप्टेंबर रोजी अवैधरित्या वाहतूक होणाºया ३४ गोवंशाची सुटका केली. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एकूण १५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवतळेकर व त्यांच्या पथकाने एका टाटा आयशर ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंश कोंबून कोहमारानवेगावबांध मार्गे नागपूरकडे नेणार असल्याची माहिती दिली. त्या आधारे नवेगावबांध पोलिसांनी नवेगावबांध पोलिस ठाण्यासमोर नाकाबंदी केली. दरम्यान पहाटे ४.४५ वाता कोहामाराकडून नवेगावबांध दिशेने जाणारा सीजी ०८, इयू ०९५६ क्रमांकाच्या आयशर ट्रकची पाहणी केली असता ३४ गोवंश जनावरे मिळून आली. हे गोवंश अवैधरीत्या कत्तलीकरीता निर्दयतेने, चाºया पाण्याविना कोंबून बंदिस्त करून वाहतूक करीत असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने पोलिसांनी ट्रक व त्यातील गोवंश जनावरे असा १५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. गोवंशाला गौशाळेत पाठविण्यात आले असून याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *