आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक पी.के.मेश्राम यांचे सेवानिवृत्ती निरोप समारंभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी जवाहरनगर : आयुध निर्माणी भंडारा चे महाव्यवस्थापक पी.के.मेश्राम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ संपन्न झाला. आयुध निर्माणी भंडारा येथे कर्मचारी व अधिकारी यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यात महाव्यवस्थापक पी.के.मेश्राम यांनी आपल्या ३४ वर्षांचा कार्यकाळ आयुध निमार्णीत पूर्ण करून ३० सप्टेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या महाव्यवस्थापक पी. के. मेश्राम यांच्यासाठी युनियन आणि असोसिएशनच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आयुध निर्माणी भंडाराचे महाव्यवस्थापक सुनील सप्रे, ओ.एस. डी. अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रसाद, ललित कुमार, संजीव पाटील व इतर अधिकारी व युनियन व असोसिएशन व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते. महाव्यवस्थापक मेश्राम यांना त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त व निवृत्तीबद्दल बद्दलशुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाºयांनी त्याना उघड्या जीपमध्ये सेवा निवृत्ती पर प्रभात फेरी ढोलताशांच्या आवाजात दोरीच्या साह्याने ओढत घरापर्यंत नेण्यात आले. कारखान्याचे भावी महाव्यवस्थापक सुनील सप्रे यांनी जीपच्या चालकाच्या सीटवर बसून वाहन चालविले. एका महाव्यवस्थापकाला एवढा निरोप देण्याची कारखान्याच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. मेश्राम हे स्थानिक तुमसर येथील रहिवासी असल्याने प्रत्येक लहान- मोठ्या व्यक्ती त्यांच्या परिचयाचा असून त्यांच्या आगमनानंतर क्रीडा व अनेक समाजाच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली. आजूबाजूचे ग्रामस्थांचे समस्याचे निराकरण केले गेले. त्यामुळे ते लोकांच्या हृदयात वसले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.