तिडके महाविद्यालयाला कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी रामटेक : श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथील कुस्तीपटूंनी आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन जोतिबा फुले शारीरिक शिक्षण महाविद्याल नागपूर येथे करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत ६१ किलो वजन गटात श्री.नरेंद्र तिड- के महाविद्यालयाच्या विद्यार्थी संजय मोहारे यांने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करुन सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन गटात श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी मोहारे हिने प्रतिस्पर्ध्यांना हरवून सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही कुस्तीपटूंची निवड आंतरविद्यापीठ स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. विजयी क्रीडापटूंनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा प्रशिक्षक प्रा.किशोर धांडे, माजी क्रीडा प्रशिक्षक प्रा.नरेश आंबिलकर यांना दिले आहे. सुवर्णपदक पटकावणाºया या दोन्ही कुस्तीपटूंचे अभिनंदन प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *