११ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर २२ हजार संगणक परीचालकाचा धडकणार मोर्चा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर आधी संग्राम व आता आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाअंतर्गत मागील १२ वर्षापासून संगणक परीचालक अगदीच तुटपुज्या मानधनावर राज्यभरातील १० कोटी जनतेपर्यंत पोहोचवून सेवा देण्याचे काम करीत आहे. तेव्हा त्याच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने ग्रामीण भागातील संगणक परीचालकाना यावलकर समितीचे शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृतीबंधा मध्ये पद निर्मीती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे आवश्यक आहे. संगणक परिचालकाच्या मागणीचा प्रश्न १२ वर्षापासुन प्रलंबित असून त्यासाठी संघटनेतर्फे नागपुर, मुंबई याठिकाणी अनेक आंदोलने करण्यात आली. मागिल हिवाळी अधिवेशनात ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यानी लेखी आश्वासन दिले. तसेच त्याचेशी अनेकदा बैठका झाल्या त्यात तुम्हाला यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आकृतीबंधात समाविष्ट करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचे मान्य केले व तसा प्रस्ताव संबंधित खात्याकडे पाठवला असल्याचे वारंवार सांगण्यात आले मात्र अद्यापही निर्णय लागलेला नाही.

ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केद्र प्रकल्पात कार्यरत संगणक परीचालकांनी यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृतीबंधानुसार लिपिक कम डाटा एंट्री आॅपरेटर पदावर सामावून घेवून किमान वेतन कायदा १९४८ नुसार निश्चित तारखेला नियमित मासिक वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून ८ नोव्हेंबर २०२३ पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे सुरू असतांनाच २० नोव्हेंबर २०२३ ला राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.काल दि.२८ नोव्हेंबर २०२३ ला तिसºया टप्प्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणेआंदोलन नियोजित होते आणि नेमक्या याच दिवशी पहाटेपासून जिल्ह्यात कुठे मुसळधार तर कुठे तुरळक पाऊस सुरू झाला. अशाही परिस्थितीत एक न एक संगणक परीचालकानी नियोजित आदोलनात उपस्थित राहुन आपल्या विविध मागण्यांबाबतचे एकदिवसीय आदोलन यशस्वी पार पाडले.

संगणक परिचालकाच्या आदोलनाला दिवसभरात अनेक नेत्यांनी भेट देऊन मागण्यांबाबत चर्चा केली. त्यात भंडारा गोदीया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेढे,जिल्हा परिषदचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जि.प.शिक्षण सभापती रमेश पारधी, जि.प.सभापती बालु सेलोकर, जि.प.गटनेते विनोद बांते, राष्ट्रीय युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यानी निवेदन स्वीकारून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष दिगांबर वंजारी यानी केले. सुरू असलेल्या आदोलनाची दखल घेऊन सरकारने लवकरात लवकर बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय द्यावा.तसे न झाल्यास येत्या हिवाळी अधिवेशनावर नागपुर येथे भव्य मोर्चा व मागण्यां मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भंडारा जिल्हाध्यक्ष दिगांबर कुंडलिक वंजारी यांनी सागितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.