काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकसानग्रस्त भागाची थेट बांधावर जाऊन पाहणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात मागील २८ नोव्हेंबर २०२३ ला झालेल्या अवकाळी पावसाने शेती व शेतकºयाचे अपार आर्थिक नुकसान झालेले आहे. आधिच या वर्षीच्या अपुºयाा पावसामुळे भंडारा जिल्ह्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असतांना त्यात आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिठीने शेतातील उभे पिक नष्ट केल आहे. धानाचे कोठार समजलेल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात धान,कापूस, तूर, सोयाबीन, कांदा, केळी, उस,या सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निदेर्शावरून आज जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. नानाभाऊ गावंडे व जिल्हाध्यक्ष श्री.मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात आज भंडारा तालुक्यातील पांढराबोडी ,मोहाडी तालुक्यातील पारडी व तुमसर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर,येरली, मितेवानी या गावात थेट बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.सदर पाहणी सर्वेक्षण अहवाल नानाभाऊ गावंडे हे महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.नानभाऊ पटोले यांना देणार आहेत.

येणाºया हिवाळी अधिवेशनात शेतकºयांना आर्थिक मदत सरकारने करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार अनिल बावनकर,प्रदेश महासचिव जिया पटेल,जिल्हा परिषदचे सभापती रमेश पारधी,सभापती स्वाती वाघाये जिल्हा उपाध्यक्ष राजकपूर राऊत,भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई बोरकर,युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी,ओबीसी विभागाचे अध्यक्ष,शंकर राऊत, भंडारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, मोहाडी तालुकाध्यक्ष राजेश हटवार,अमरजी रगडे,जय डोंगरे, बाळा ठाकूर,कान्हा बावनकर,उमेश कटरे, उमेश पटले,सुरेश मेश्राम, कुसुमताई कांबळे,कांचन कटरे, दिलीप गौतम,शुभम गभने,निलेश अहिरे,सुनील गिरीपंजे,विजय शहारे,सूर्यभान बावणे,गोलू रोडके, गजानन झंझाड, अरविंद मनगटे, ग्यानिराम शेंडे,केशव शेंडे, शोभाताई बुरडे, गिताताई बोकडे,वंदना मेश्राम, अरुणा श्रीपाद,कविता बावणे, रंजीत सेलोकर,भाऊराव डायरे,गंगाराम निंबार्ते, रामचंद्र गाढवे,मीराबाई निंबार्ते, संजय मते, प्रामुख्याने शेतकरी व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *