मकरसकातीच्या पतगीचा आतापासन ज्वर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मकरसंक्राती २० दिवसांवर येऊन ठेपली असताना पतंग प्रेमीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसते. आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसतात. मात्र, पतंगासाठी बंदी असलेला चिनी मांजा वापरला जात असल्याने हा मांजा पक्ष्यासाठी कर्दनकाळ ठरत आहे. मकरसंक्रातीचा अजून २० दिवसांचा अवधी आहे. तरी बाजारात पतंग विक्रीची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. पतंगप्रेमी विनाव्यत्यय पतंग उडवण्याचा आनंद लुटताना दिसतात. मात्र, पतंग उडवण्यासाठी बंदी असलेल्या चिनी मांजाचा सर्रास वापर होत असल्याने या परिसरातील एकांत शोधत असलेले नागरिक, शारीरिक कसरत करणाºया युवकांसह पक्ष्यांनाही धोका उद्भवला आहे. अनेक जणांना या मांजामुळे गंभीर दुखापत देखील झाली आहे. नैसर्गिक अधिवास असलेल्या या क्षेत्रात पक्ष्यांनादेखील या मांजामुळे इजा होते. चिनी मांजावर बंदी असताना हा मांजा सहज उपलब्ध कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पक्ष्यांना उडतांना चीनी मांजा बारीक असल्याने दिसत नाही आणि तो धारदार असतो. त्यामुळे उडताना अचानक पक्षी त्यात अडकून जखमी होतात. पक्ष्यांचा गळा, पंख, पाय कापले जाऊन जीव जातो. पक्षीच काय, गाडी चालवताना गळ्याभोवती हा मांजा अडकल्याने अनेक माणसेही गंभीर जखमी झालेली तर काही दगावलेली आहेत. पतंगप्रेमींनी जबाबदारीने जर चायनीज मांजाचा वापर टाळला तर अनेक पक्ष्यांचे जीव वाचू शकतील. माणसांना सुध्दा गंभीर इजा होणार नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *