विषबाधेतून ११ मोरांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मदनी (दिंदोडा) शेतशिवारात एकाचवेळी ११ राष्ट्रीय पक्षी मोरांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार २६ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मदनी दिंदोडा शेतशिवारात शेतकरी गजानन कुबडे यांच्या शेतात ११ मोर मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती वनविभाग कार्यालयाला देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक वनसंरक्षक जी. पी. बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, क्षेत्र सहाय्यक जी. एस. कावळे, वनरक्षक डी. एम. माजरे, वनरक्षक पी. डी. कणेरी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. वनाधिकाºयांनी पंचनामा केल्यानंतर विषबाधेमुळे ११ मोरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

अज्ञात व्यक्तीने राखडीमध्ये विष मिसळले. राखडीतून दाणे टिपताना विष मोरांच्या पोटात गेले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी वर्तविला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळीच सर्व मोरांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर पुढील तपासणीसाठी व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविला. सर्व मोरांवर एकत्रित अन्त्यसंस्कार करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *