दोन लाचखोर पोलीस जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण निकाली काढण्यासाठी लाच मागणाºया ग्रामीण पोलिस विभागातल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिसांपैकी एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. विशाल रामराव हरणे, प्रशांत महादेव ढोके, असे लाच मागणाºया ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतल्या दोन पोलिसांची नावे आहे. सदर प्रकरणातील तक्रारदार यांच्यावर कलम ११० प्रमाणे दाखल असलेली प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण निकाली काढण्याकरिता ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी विशाल हरणे व प्रशांत ढोके यांनी १५०० रुपयाची लाच त्यांना मागितली होती. या बाबत १० आॅगस्ट रोजी तक्रारदाराने तक्रार केली. सदर तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मंगळवारी गुन्हे शाखा परिसरातच सापळा लावण्यात आला. पोलिस कर्मचारी हरणे तक्रारदार यांच्या कडून एकून लाच रक्कमे पैकी ५०० रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ सापडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल कडू, केतन मांजरे, कर्मचारी विनोद कुंजाम व इतरांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *