‘ग्रामगीता’ मानवी जीवनासह विश्व कल्याणाचा ग्रंथ : खा.मेंढे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : ग्रामगीता हा संपूर्ण मानवी जीवन सुखी करून विश्व कल्याण साधणारा ग्रंथ आहे, असे भावोद्गार राष्टÑसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार सुनील मेंढे यांनी काढले. लाखनी येथील संताजी मंगल कार्यालयात एक दिवसीय राष्टÑसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी राष्टÑसंतांची भजने ही संस्कारमय असल्याचे सांगून समाजात अन्यायाविरूध्द लढा उभारणारे व रणसिंग फुंकणारे असे प्रेरणादायी विचाराचे साहित्य राष्टÑसंतांनी समाजाला दिले असल्याचे खा.मेंढे म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार डॉ. परिणय फुके, ग्रामगीताचार्य अरविंद राठोड, बाजार समितीचे सभापती शिवराम गिरेपुंजे, ज्ञानेश्वर रक्षक, पंचायत समिती सभापती प्रणाली सारवे, प्रदीप पडोळे, शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, मुरमाडीचे सरपंचशेषराव वंजारी, माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, डॉ. गजानन डोंगरवार, जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष राहुल निर्वाण व्यासपीठावर होते. या साहित्य संमेलनात तीन परिसंवाद घेण्यात आले. यात डॉ.जयश्री सातोरकर, ग्रामगीताचार्य पौर्णिमा सवाई, प्रा. डॉ. अलका सोरदे, प्रा.डॉ.प्रशांत ठाकरे यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंगेश बेहलपांडे यांनी तर संचालन पुरुषोत्तम झोडे यांनी केले. आभार काकिरवार यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव चुटे, सुभाष बावनकुळे, नरेश टिचकुले, बापू हटवार, दिनेश वंजारी, ओमप्रकाश शेंडे, संजय वनवे, भीमराव गभने, अबीर वंजारी, उमेश शिंगनजुडे, मंगेश बांते, भूषण मोहतुरे इत्यादी मंडळींनी प्रयत्न केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *