ज्यामुळे गरजूंच्या चेहºयावरील आनंद दिसतो, ते काम माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे – खा. मेंढे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील प्रभाग तीन मध्ये शासकीय जमिनीवर राहणाºया अतिक्रमण धारकांना हक्काचे पट्टे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष म्हणून काम करताना खासदार सुनील मेंढे यांनी शहरातील सरकारी पट्ट्यांचा विषय अत्यंत महत्त्वाचा म्हणून हाताळला होता. प्रशासकीय यंत्रणेला हाताशी घेऊन आणि कालबद्ध कार्यक्रम देत पट्टे देण्यासंदर्भात यंत्रणा कामाला लावली होती. यासाठी विशेष कार्यशाळा घेण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती. याच प्रयत्नांची फलश्रुती म्हणून शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील ३५ अतिक्रमण धारकांना शासकीय पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्य अधिकारी विनोद जाधव, माजी नगराध्यक्ष रामदास शहारे, सचिन कुंभलकर, आशा उईके, अनुप ढोके, आशू गोंडाणे, रुबी चड्डा, चंद्रकला भोपे, मयूर बिसेन, प्रशांत निंबोळकर, विकास मदनकर, रोशन काटेखाये, शिव आजबले, कैलास तांडेकर, शैलेश मेश्राम, मनोज बोरकर, वनिता कुथे, गीता सिडाम, जुमला बोरकर, रामू शहारे, डेव्हिड पारधी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित त्यांना संबोधित करताना खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले, की आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. गरजू कुटुंबाला स्वत:च्या हक्काचे घर मिळणे यापेक्षा दुसरा आनंद कुठला नसतो. ज्यामुळे त्यांच्या चेह-या वर आनंदी होईल असे काम करताना मिळणारे समाधान वेगळेच असते. मी काम करताना पक्ष धर्म जात हे कधीच आड येऊ देत नाही. आज काही लोकांनाच पट्टे मिळाले असले तरी शेवटच्या माणसाला पट्टा मिळेपर्यंत मी सोबत असेल असा विश्वास यावेळी खासदारांनी दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *