मामा-भाचा यात्रेला भाविकांची अलोट गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सडक अर्जुनी : तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे १ व २ जानेवारी रोजी मामा-भाचा देवस्थान समिती व सरपंच उमराव कापगते यांच्या पुढाकाराने मामा भाचा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात्रेला गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर, गडचिरोली, बालाघाट जिल्ह्यातील भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेच शुभारंभ आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते जिप सदस्य निशा तोडासे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी पंस सदस्य डॉ. रुखीराम वाढई प्रामुख्याने उपस्थित होते. सडक अजुर्नी तालुक्यातील गिरोला गावापासून एक किमी. अंतरावर व साकोली तालुक्यातील सातलवाडा या दोन गावांच्या मध्यभागी मामा भाचा देवस्थान असून निसर्गरम्य वातावरणात ही यात्रा भरते. गेल्या १८ वर्षांपासून या यात्रेचे आयोजन करण्यात येत असून यंदा १ जानेवारीला ज्योत प्रज्वलनाने करण्यात यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

रात्री मनोरंजनासाठी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, यावेळी गोंदिया व भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूर, गडचिरोली, बालाघाट जिल्ह्यातील भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेचा समारोप २ जानेवारीला दहीकाला वितरण करुन करण्यात आला. यात्रेच्या आयोजनासाठी सरपंच उमराव कापगते, देवस्थान समिती सदस्य शामराव कापगते, सेवकराम चांदेवार, आशिष संग्रामे, दामोधर बांगरे, आशिष दरवडे, प्रशांत कापगते, रामदास दरवडे, रमेश कापगते, हरिचंद वलथरे, राजाराम बांगरे, गुलाब पुसाम, हेमेंद्र तागडे, हेमराज कुंभरे, चंद्रशेखर लंजे, फुलीचंद कापगते, महेंद्र खैरे, विजय माने, मंगर वलथरे, दिगांबर तागडे, उमेश तागडे, सुनिल कापसे व गिरोला ग्रामवासी यांनी सहकार्य केले. मामा भाचा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथील निसर्गसौदयार्मुळे भाविक व पर्यटकांची वर्षभर वर्दळ राहते. या देवस्थानाला तिर्थस्थळ व पर्यटनाच्या दर्जा मिळावा, अशी मागणी होत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याची खंत देवस्थान समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.