वैनगंगा नदीपात्रात आढळले इसमाचे मृतदेह

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : मानसिक रुग्ण असलेल्या एका इसमाने वैनगंगा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी उघडकिस आली. ताराचंद सहादेव राघोर्ते (४२) रा. गराडा/खुर्द, ता. जि. भंडारा असे मृतकाचे नाव असून सिरसघाट गावाजवळील वैनगंगा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळला. मृतक हा मानसिक रूग्ण असल्याने दि. ७ फेब्रुवारी रोजी घरुन ५०० रु. घेवून शेतीला लागणारे सामान आणतो म्हणू घरुन निघून गेला मात्र तो घरी परत न आल्याने त्याची पत्नी पद्मा ताराचंद राघोर्ते (३६) रा.गराडा/खुर्द हिने पोलीस स्टेशन कारधा येथे पती ताराचंद बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.

मात्र दिनांक १५ फेब्रुवारी रोजी मृतकाचे प्रेत सिरसघाट गावाजवळील वैनगंगा नदीकाठावर तरंगतांना आढळले. मृतकाने मानसिक त्रासाला कंटाळुन वैनगंगा नदीत उडी मारून त्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांची पत्नी फिर्यार्दी पद्मा ताराचंद राघोर्ते हिच्या तोंडी तक्रारीवरुन पोहवा रेखा मेश्राम यांनी सदरचा मर्ग दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पोहवा संदिप केंद्रे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *