नाट्यसभागृह बांधकामासाठी रस्त्याचा बळी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा नगर परिषदेतर्फे शहरातील वार्ड क्र. १२ मधील जुन्या गांधी शाळेच्या पश्चीम भागातील रहदारीचा रस्ता बंद करुन त्या जागेवर नाटयसभागृह उभारले जात आहे.त्याला स्थानीक नागरीकांचा मोठा विरोध असुन सदर नाट्यगृहाचे बांधकाम रद्द करून रस्ता रहदारीकरीता मोकळा ठेवण्यात यावा अशी मागणी स्थानीक नागरीकांना भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. भंडारा शहरातील वार्ड नं. १२ मध्ये पुर्वी गांधी शाळा अस्तीत्वात होती. त्या ठिकाणी आता रिकामी जागा असुन पश्चिमेच्या बाजूला एक रस्ता आहे. सदर रस्ता भंडारा नझुलच्या नकाशानुसार क्र. ३ चा रस्ता असा उल्लेख आहे. सिटी सर्व्हनुेसार आखीव पत्रीकेवर सुध्दा रस्ता दाखविलेला असतांना सदर रस्ता बंद करुन शाळेच्या रिकाम्या जागेवर समाजातील काही नितीभ्रष्ट लोकांनी नाटयसभागृह बांधकाम करण्याचा घाट घातला आहे. ज्या वस्तीत आमच्या तीनचार पिढया वास्तव्यास आहेत आणि येथील नागरीकांना रहदारीचा हाच एकमेव मार्ग असतांना सदर रस्ता बंद करून तिथे नाट्यसभागृह बांधकामाचा घाटघातल्याने नागरीकांना रहदारीस मार्गच राहणार नाही. काही आंबट शौकिनांच्या हौसेखातर व चारपाच धनाढ्य ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी भंडारा नगर परिषदेने हा अट्टाहास चालविला असुन त्याचा त्रास स्थानीक नागरीकांना होणार आहे. सदर रस्ता बंद झाल्यास भविष्यात येथील घरांना आग लागुन हानी झाल्यास अग्णिशामक दलाची गाडी सुध्दा येवु शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. करीता सदर ठिकाणी नियोजीत नाट्यसभागृहाचे बांधकाम रद्द करून सदर मार्ग नागरीकांना रहदारीकरीता मोकळा ठेवण्यात यावा अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *