मराठा-कुणबी प्रमाणे भटक्या विमुक्तांची जनगणना करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- राज्यात सुरु असलेल्या मराठा-कुणबी जनगणना सर्वेक्षणात भटक्या विमुक्तांची सुध्दा जनगणना करावी, अशी मागणी बेलदार समाज संघर्ष समितीतर्फे श्री राजेंद्र बढिये यांच्या नेतृत्वाखाली राज्य मागासवर्ग आयोगाकडे करण्यात आली आहे. (ता २७) रविभवन नागपूर येथे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य अ‍ॅड चंदालाल मेश्राम शासकीय दौºयावर आले होते. त्यावेळी बेलदार समाज संघर्ष समितीतर्फे प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र बढिये यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्र सरकारने इदाते आयोगाच्या शिफारशीनुसार १८ आॅगस्ट २०२० रोजी पत्र पाठवून भटक्या विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करण्याचे राज्य शासनाला कळविले होते. मात्र यद्यापही भटक्या विमुक्तांची जनगणना करण्यात आली नाही. त्यामुळे मराठा- कुणबी जनगणना सर्वेक्षणा सोबतच भटक्या विमुक्तांची जनगणना करण्याची मागणी करण्यात आली.

यावर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य अ‍ॅड. चंदालाल मेश्राम यांनी सांगितले की, भटक्या विमुक्तांच्या जनगणना सर्वेक्षणाचा अहवाल आयोगाने भारत सरकारला पाठवला पण भारत सरकारने त्यावर पैसे व काही उत्तर पाठवले नाही. त्यामुळे भटक्या विमुक्तांची जनगणना थांबली असल्याचे सांगितले. समाज संघटने सोबतच लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. निवेदन देतेवेळी बेलदार समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र बढिये, मिलिंद वानखेडे, खिमेश बढिये, मुकुंद अडेवार, प्रेमचंद राठोड, दिनेश गेटमे, भिमराव शिंद मेश्राम, ी किशोर सायगन यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *