९ फेबु्रवारी रोजी प्रिमिअर लीग क्रिकेट सामनाचा थरार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सध्या देशभरात आयपीएल लीग चे वारे जोरात वाहत असून स्थानिक खेळाडूंना प्राधान्य देण्याकरीता युनीवर्सल स्पोर्टस् फांऊडेशन व लॉयन्स क्लब फांऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा शहरातील माधव नगर ग्रांऊंड मध्ये ९ फेबु्रवारी रोजी प्रिमिअर लीग क्रिकेट सामन्याचा थरार सुरू होणार आहे. या सामन्यांसाठी खेळाडूंचा लिलाव आज दि. ५ फेबु्रवारी रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे तसेच भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. सुनील मेंढे यांच्या देखत खेळाडूंचा लिलाव देवेंद्र लॉन येथे होणार आहे. या खेळाडूंचा लिलाव शहरातील नामांकित स्पोर्टस् प्रेमी करणार आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आयपीएल सामन्यांच्या पध्दतीनुसार भंडारा प्रिमिअर लीगचा टेनिस बॉल क्रिकेट चे आयोजन करण्यात येते. भंडारा जिल्ह्यातील संपुर्ण खेळाडूंचा लिलाव करून आयपीएल पध्दतीने एकूण आठ टिम बनविण्यात येणार आहे. खेळाडुंचा लिलाव करण्याकरीता शहरातील क्रिकेट प्रेमी आठ मालकांनी (ओनर्स) यामध्ये सहभाग घेणार आहेत. डिम्पल मल्होत्रा व जयंत गज्जर यांचे डीजे अवेंजर्स, रूपेश टांगले, टांगले टायगर्स, मंगेश मुरकूटे व वेदांत निंबार्ते, अशोका वारियर्स, सुमीत घोगरे, साई वारीयर्स, विशाल भिवगडे व राकेश चुटे, विहा – ११,६ राकेश गडीगोने , रोशन येळणे व चेतक डोंगरे आर आर सी रॉयर्ल्स, डॉ. नाने हॉस्पीटल ११,८, विवेक पडोळे वायपी वारियर्स हे सगळे ओनर्स खेळाडूंसाठी सरसावनार आहेत.

खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया आज दि. ५ फेबु्रवारी रोजी सायं.६ वाजता देवेंद्र लॉन येथे क्रिडाप्रेमी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे तसेच भंडारागोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. सुनील मेंढे यांच्या देखत होणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे ,प्रदेश महासचिव धनंजय दलाल, डीपीओ नागपूरचे जाधव, मुख्य अधिकारीकरणकुमार चव्हाण, सिध्दांत मेश्राम, विवेक मेश्राम, माजी नगराध्यक्ष बाबू बागडे, महेंद्र गडकरी, विनयमोहन पशिने, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नरेंद्र बुरडे, युवा सेना जिल्हा प्रमुख जॉकी रावलानी, उद्योजक नितीनजी दुरूगकर, दिपक चड्डा, नितीन सोनी, मुरारी काबरा, तुषार काळबांधे आदी उपस्थित राहणार आहे. स्पर्धेत विजय चमुला प्रथम क्रमांकाचे पारितोषीक १ लाख रुपए असून द्वितीय पारितोषीक ५१ हजार रुपए राहणार आहे. विशेष पुरस्काराने सुध्दा खेळाडूंचा सन्मान होणार आहे. अशा आयपीएल प्रिमिअर लीग सामन्याचे थरार सामने बघण्याकरीता अथवा आनंद घेण्याकरीता क्रिडा प्रेमींनी , नागरिकांनी आश्वाद घ्यावा असे आवाहन युनीवर्सल स्पोर्टस् फांऊडेशनचे अध्यक्ष रूपेश टांगले व लॉयन्स क्लबचे अध्यक्ष डिम्पल मल्होत्रा यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *