महाशिवरात्री यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्तीला झाली सुरुवात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : गायमुख देवस्थानकडे जाणाºया रस्त्याची दुर्दशा झाल्याबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद यांना निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. यासंदर्भात दैनिक भंडारा पत्रिका या वृत्तपत्राने ‘गायमुख देवस्थानकडे जाणाºया आंबागड-रामपूर रस्त्याची दुर्दशा’, व ‘महाशिवरात्रीची यात्रा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे डांबर- ीकरण करा- शिवसेना’ या मथळयाखाली शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी रोजी बातमी प्रकाशित केली होती.

या बातमीची दखल जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद यांनी घेऊन संबंधित उपविभागीय अधिकारी सुरेश मस्के यांना त्वरित रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने शनिवार पासून गायमुख देवस्थानकडे जाणाºया आंबागड ते रामपूर रस्त्यावरील डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे गायमुख येथे महाशिवरात्री यात्रेत येणाºया भाविकांना दिलासा मिळणार आहे. बातमीची दखल घेवून रस्त्याची दुरुस्ती होत असल्याने दैनिक भंडारा पत्रिकाचे तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांचे तुमसर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील भाविक भक्तांनी आभार मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *