आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत ४ सुवर्णपदक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : येथील ज्योती गडेरिया या खेळाडूने आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तब्बल ४ सुवर्णपदक पटकावून भंडारा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. दिल्ली येथे २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित एशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशीपमध्ये ज्योतीने भारताचे प्रतिनिधीत्व करताना ४ सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या पॅरासायकलिंगमध्ये ज्योतीने यश संपादन केले. याशिवाय २०० मीटर्स फ्लाईंग्स, १५ किलोमीटर स्केच रेस, ५०० मीटर टाईम ट्रायल तसेच ३ किलोमीटर वैयक्तिक पॅराशूट गटातून एकूण ४ सुवर्णपदक कमावले. डोंगरगाव येथील शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ज्योतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हे यश मिळविले आहे. ती प्रारंभी कबड्डीची खेळाडू होती. मात्र २०१६ मध्ये ज्योतीने एक पाय गमावला. परंतु शारीरिक व्याधीपुढे हार न मानता पुढे तिने सायकलिंगवर लक्ष केंद्रित केले. २०१९ मध्ये साऊथ कोरिया येथे आयोजित एशियन चॅम्पियनशिपमध्ये पहिले कांस्यपदक मिळविले. याकरिता प्रशिक्षक आदित्य मेहता यांनी तिची मदत केली. हैदराबाद अकादमीला २०२२ मध्ये प्रवेश मिळवून ३ वर्षात ज्योतीने तब्बल ११ सुवर्णपदक कमावले. आता ती १५ मार्च रोजी ब्राझील येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *