राकाँ, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : स्थानिक एसएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात माजीमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने आयोजीत नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तथा पारितोषिक वितरण सोहळा १० मार्च रोजी पार पडला. यावेळी काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे वरिष्ठ नेते महाराष्टाचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजपामधे प्रवेश घेतला. माजीमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या क्षेत्रात भाजपाची पाळेमुळे खोलवर रुजविली आहे. अत्यंत मृदभाषी व शांत स्वभावाचे बडोले सतत जनतेच्या संपर्कात राहत आहेत. त्यांच्या कार्यकतृत्वार विश्वास ठेवून तालुक्यातील अरततोंडी येथील रहिवासी व झाडीपट्टीतील प्रख्यात नाट्यलेखक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय ठवरे, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते तथा युवा सामाजिक कार्यकर्ते अश्विनसिंग गौतम तसेच मिना शहारे यांच्या नेतृत्वात तावसी, निलज येथील अनेक महिला कार्यकर्ते आणि केशोरी परिसरातील प्रकाश गहाणे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

प्रवेशकर्त्यांचे माजीमंत्री राजकुमार बडोले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष संजय भेंडे, खासदार सुनिल मेंढे, अँड. येसूपाल उपराडे, माजी आमदार हेमंत पटले, संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब, जेष्ठ नेते नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, उमाकांत ढेंगे, तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते, रचना गहाणे, प्रकाश गहाणे, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, जे. डी. जगणीत, सडक अजुर्नी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदींनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे अजुर्नी मोर. विधानसभा क्षेत्रात भाजपाची ताकत वाढली असून माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हात मजबूत होणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *