भरधाव स्कॉर्पिओ अचानक उलटली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपुरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. लग्नसमारंभाला जाणारी भरधाव स्कॉर्पिओ उभ्या कारवर आदळून उलटल्याने एक दाम्पत्य ठार झालं आहे. तर एकाच कुटुंबातील पाच जणांसह, स्कॉर्पिओ चालक असे सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बुटीबोरी परिसरात घडली.राजेश मुरारीलाल श्रीवास्तव (वय ५२) आणि पूजा राजेश श्रीवास्तव (वय४५, दोन्ही रा. रामनगर, वर्धा) अशी मृतकांची नावं आहेत. जखमींमध्ये राणी श्रीवास्तव (वय ६३), अमन श्रीवास्तव (वय २६), संगीता श्रीवास्तव (वय ४८), राकेश श्रीवास्तव (वय ५२ सर्व रा. रामनगर, वर्धा) आणि चालक सारंग गोल्हर (वय २६ रा. धामणगाव वाठोडा) याचा समावेश आहे.

जखमींवर बुटीबोरीतील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच, सिन्नर तालुक्यात स्कॉर्पिओचा भीषण अपघात; २ ठार ३ गंभीर श्रीवास्तव कुटुंब नागपुरातील लग्नसमारंभासाठी एमएच-४०-बीई३१९१ या क्रमांकाच्या कारने वध्यार्हून निघाले होते. स्कॉर्पिओचा वेग अधिक होता. बुटीबोरीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. स्कॉर्पिओ रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या एमएच-२९-एके-६१८६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळून उलटली. अपघातानंतर वर्धा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातानंतर नागरिकांची एकच गर्दी जमली होती. माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *