१४ जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी पोलीसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाºया वाहनावर कारवाई करीत एकुण १४ जनावरांची सुटका केली. यावेळी पोलीसांनी जनावरे व वाहन असा एकुण मिळुन ७ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त केला. लाखनी तालुक्यातील मानेगाव/सडक ते बोरगाव/बुज मार्गावर लाखनी पोलीसांनी बोलेरो मॅक्स पिकअप वाहन क्र.एम.एच.४९ बीझेड ६४९८ ला थांबवुन तपासणी केली असता वाहनामध्ये लहान मोठे असे गोवंश जातीचे पांढºया रंगाची ७ जनावरे आढळुन आली त्यापैकी १ गौवंश मृतावस्थेत आढळुन आले. तसेच ५ गोवंश जातीचे लाल रंगाचे जनावरें त्यापैकी १ जनावरे (गाय) लाल रंगाची मृतावस्थेत असल्याचे आढळुन आले व लाल पांढºया रंगाची १ गोरी,काळ्या पांढºया रंगाचा १ गोरा असे एकुण मिळुन ७० हजार रूपये किंमतीची १४ निर्दयीपणे कोंबुन त्यांची वाहतुक करणारे मिळुन आली.

पोलीसांनी आरोपी वाहन चालकाला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातुन ७० हजार रूपये किंमतीची जनावरे,एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत ५ हजार रूपये व बोलेरो वाहन किंमत ७ लाख रूपये असा एकुण ७ लाख ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी लाखनी पोलीसांनी अप क्रमांक ३४८/२०२२५ कलम ५ (अ) (ब), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम, सहकलम ११ (१) (ड) (अ) (इ) (फ) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा प्रतीबंध कायदा बाबत अधिनीयम, सहकलम ११९ महाराष्ट पोलिस अधिनियम, सहकलम ३२५ भा.न्या. स. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , पोनि. पिसाळ सा. यांच्या मार्गदर्शनात पोउपनी रेहपाडे पो. स्टे. लाखनी यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन लाखनी चे अधिकारी करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *