भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सह. संस्था शासनाच्या अडचणीमुळे संस्थेची अनिष्ठ तफावत वाढल्याने मोहाडी तालुक्यातील सर्व विवधि कार्यकारी सेवा सह.संस्था डबघाईस आल्याने अवसायनात जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे सहकार विभागाने यावर योग्य ती चौकशी करुन संस्थेला वाचविण्याकरीता शासनाने योग्य निर्णय घ्यावे. याकरिता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटना तालुका मोहाडीच्या वतीने मार्गदर्शक भैय्याजी गभने, रामसिंग बैस यांच्या नेतृत्वाखाली सचिव भोलाराम साठवणे, राधेश्याम हिरामण गाढवे, सुरेश घरजारे, अरुण बोंदरे, कृष्णा सोनवणे, शिवकुमार गायधने, महादेव शेंडे, अनंतराव मोहतुरे, हंसराज आगासे, आनंद मलेवार, राजू मानव कोहपरे यांनी बुधवार दि.३ सप्टेंबर २०२५ ला दुपारी १२ वाजता निवेदन मोहाडी तालुका सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंध देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. प्राप्त निवेदनानुसार, विविध कार्यकारी सेवा सह. संस्था हया शासनाने संपूर्ण कर्जमुक्त करावे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोहाडी तालुक्यात सुरु करण्यात यावी. विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेची अनिष्ठ तफावतची रक्कम शासनाने किंवा बँकेनी पूर्ण माफ करावी.

शासनाच्या परिपत्रकानूसार दामदुपटीपेक्षा कर्जावरील व्याजाची रक्कम जास्त घेण्यात येवू नये. त्याच्या फरकाची रक्कम शासनाने भरावी. शासनाच्या पत्रानूसार रुपांतर झालेले कर्ज शासनाने पूर्णपणे माफ करावे. गटसचिवाची नियुक्ती उपनिबंधक यांच्यामार्फत होते परंतु त्याचा पगार संस्थेकडून देण्यात येते तरी या गटसचिवांचा पगार शासनाने द्यावा. पंजाबराव देशमुख व्यान सवलत योजनेतून येणारी गाळा रक्कम २ टक्के ऐवजी ५ टक्के देण्यात यावी. विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेच्या कामकाजाकरीता कार्यालय शासनाने तयार करुन देण्यात यावे. शासनाने नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन निधी शिल्लक असलेल्या सर्व शेतकºयांना देण्यात यावे. अंकेक्षणकरीता आॅडीटरची नियुक्ती शासनाने करावी व शासनाने त्याची फी द्यावी.
मोहाडी तालुक्यातील दुय्यम निंबधक कार्यालयांनी शेतजमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय करु नये. मोहाडी तालुक्यातील तहसिलदार, महसुल विभाग यांनी वारस हक्काचे नाव फेरफार करतांनी विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय फेरफार करु नये. कर्ज थकीत झालेल्या शेतकºयांच्या ७/१२ वर बोझा चढविण्याची मंजूरी शासनाने द्यावी.विविध कार्यकारी सेवा सह.संस्थेचे संचालक कार्यकारणीतून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सह.बँक मर्या.भंडारा येथे बँक प्रतिनिधी संचालक मंडळातून घेण्यात यावे, असे एकूण १४ मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा उपनिबंधक, आमदार राजू माणिकराव कारेमोरे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.भंडारा यांना पाठविण्यात आली.