मोहाडी तालुक्यातील शेत पांदण रस्त्यांचा प्रश्न मिटणार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : ग्रामीण भागातील शेत रस्त्यांच्या प्रश्न आजही कायम आहे. शेतकºयांना पायी जाणे अडचणीचे होत आहे. अलीकडे शेती व्यवसायात प्रगती होत असताना रस्त्यांची अडचण होती. शेत -पांदण रस्त्यांच्या प्रश्न मिटणार आहे. मात्र, गाव विकासात राजकीय द्वेषापोटी अडचणी निर्माण होत आहेत. गाव विकासासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे तसेच संबंधित यंत्रणांनी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात बुधवार दि.१० सप्टेंबर २०२५ ला दुपारी ३ वाजता वार्ताहर परिषदेत सभापती जगदीश शेंडे (धोप) यांनी केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीच्या मार्फत बरेच विकास कामे होत आहेत. ही कामे ग्रामपंचायत स्तरावर राबवली जात आहेत. पूर्वी शेत-पांदण रस्त्यांच्या दुर्दशेमुळे शेतकºयांना चिखलातून वाट काढावी लागत होती. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट होती.

रस्त्यांच्या अभावी शेतकºयांना शेतीमधील पीक बाहेर अवघड होत होते. पावसाळ्यातील पिके आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असतानाही रस्त्या अभावी ती पिकविण्याच्या विचार करता येत नव्हता. आता शेत पांदण होत असल्यामुळे शेत रस्ते उभारणीला प्राधान्य दिले जात आहे. तालुक्यात शेत पाणंद अनेक ठिकाणी चांगली कामे करण्यात आली. ग्रामपंचायतद्वारे अंदाजपत्रकाप्रमाणे कामे व्हावीत. कामात अनियमितता करणाºयांच्या पाठीशी कुणीही राहणार नाही. वार्ताहर परिषदेला सभापती जगदीशशेंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, माजी सभापती रितेश वासनिक (वरठी), पं.स.सदस्य आशा सतिश बोंदरे (खडकी), बाणा सव्वालाखे (खमारीबुज), तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश हटवार (सातोना), सरपंच भुपेंद्र नागफासे (हिवरा), प्रकाश खराबे (पालडोंगरी), मनोहर राखडे (दहेगाव) आदींची उपस्थिती होती.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *