
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : भंडारा वनविभागामार्फत साकोली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया किन्ही नियत क्षेत्रातील मौजा उकारा येथे वनजमिनीवर अवैधरित्या करण्यात आलेल्या अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पार पडली. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील नियम ५३ व ५४ अन्वये मा. सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) साकोली यांना प्राप्त अधिकारांनुसार, कार्यालयीन आदेश क्रमांक सवसं (रोहयो,संरक्षण व अ.नि.) /सा/१८४० दिनांक ०३.१२. २०२५ नुसार ही कारवाई राबविण्यात आली.
या कारवाईत श्रीमती ताराबाई प्रभाकर येसनसुरे (रा. साकोली) यांचे ०.१२ हे. आर., श्री. जयदेव धोडू येसनसुरे (रा. चारगाव) यांचे ०.०६ हे. आर., श्री. प्रभाकर धोंडू येसनसुरे (रा. साकोली) यांचे ०.१४ हे. आर. तसेच श्री. संजयकुमार प्रमोद नशीने (रा. साकोली) यांचे ०.१५ हे. आर. असे एकूण ०.४७ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. ही कारवाई योगेंद्र सिंह (उपवनसंरक्षक, भंडारा) व संजय मेंढे (सहाय्यक वनसंरक्षक, साकोली) यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कटरे, वनपरिक्षेत्र अधिकारी साकोली यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. साकोली व लाखनी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाºयांनी संयुक्तपणे कारवाई केली. यावेळी श्रीमती शालू धनंजय इळपाते (सरपंच, उकारा) व मानीकराव सिताराम तरोने (पोलीस पाटील, उकारा) यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. वनजमीन संरक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली असून पुढेही अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.