पूर्व विदर्भाच्या श्रद्धास्थळी भव्य यात्रेची चाहूल!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील कुभंली येथे चुलबंद नदीच्या काठावर असलेला दुगार्बाई डोह मकरसंक्रांतीच्या पर्वावर पुन्हा एकदा लाखो भाविकांच्या श्रद्धेने गजबजणार आहे. १४, १५ व १६ जानेवारीला तीन दिवस चालणा?्या या प्राचीन यात्रेला विदर्भासह मध्यप्रदेश व छत्तीसगडमधून भाविक, व्यापारी आणि पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. दुगार्बाईच्या पावन डोहात स्नान करून मनोभावे पूजा-अर्चा करणे आणि नवस फेडणे ही या यात्रेची प्रमुख परंपरा असून श्रद्धा, आस्था आणि लोकसंस्कृतीचा अद्वितीय संगम येथे पाहायला मिळतो.

एकेकाळी संपूर्ण मध्य भारतात गाजलेला कुभंलीचा घोडा बाजार ही यात्रेची ओळख होती. टांगा, बग्गी, बैलगाडी आणि शेतीकामांसाठी घोड्यांची प्रचंड मागणी असलेल्या काळात राजनांदगाव, रायपूर, बालाघाट, शिवनी, कटंगी आदी भागांतून व्यापारी येथे दाखल होत. आज आधुनिक वाहनांनी घोड्यांची जागा घेतली असली, तरी त्या वैभवशाली परंपरेची आठवण म्हणून मंदिर परिसरातील भव्य घोड्यांच्या मूर्ती आजही इतिहासाची साक्ष देतात. या यात्रेची हृदयस्पर्शी आख्यायिका लोकांच्या श्रद्धेला अधिक गहिरी बनवते. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी गवळी समाजातील सात भावांनी देवीच्या दृष्टांतानुसार हा डोह खोदला. बहीण दुगार्ने अनवधानाने भावांना काम करताना पाहिल्यानंतर घडलेली दु:खद घटना आणि त्यातून निर्माण झालेली दुगार्बाईची कथा आजही भाविकांच्या मनात आदर व करुणेची भावना जागवते.

याच घटनेनंतर दुगार्बाई डोहावर यात्रेचे स्वरूप आले आणि तो आज संपूर्ण पूर्व विदभार्तील एक महान श्रद्धास्थान बनला. यात्रेतील बाजारपेठ ग्रामीण संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवते. दगडी पाटा-वरोटा, खलबत्ता, पायली, झारे, कढाई, ईरा, शेतीसाठीची लोखंडी अवजारे, घरगुती वस्तू, सौंदर्यप्रसाधने व विविध हस्तकला साहित्यांची रेलचेल असते. तीन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने हा परिसरातील अर्थकारणालाही मोठा आधार देणारा उत्सव ठरतो. सोबतच कृषी, आरोग्य व इतर शासकीय विभागांच्या जनजागृती उपक्रमांमुळे ही यात्रा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचे केंद्रही बनते. लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन पूर्ण सज्ज आहे. साकोली आगाराकडून अतिरिक्त बससेवा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वैद्यकीय पथके, अग्निशमन व्यवस्था आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात येत आहेत. चुलबंद नदीकाठावर गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. श्रद्धा आणि सुरक्षितता या दोन्हींचा समतोल राखत, कुभंलीची दुगार्बाई यात्रा यंदाही पूर्व विदभार्तील एक भव्य आणि अविस्मरणीय धार्मिक महोत्सव ठरणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *