
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल कंपनी लिमिटेड’मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, सध्याच्या स्थितीत आॅरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे १४ महिलाउपचार घेत आहेत. एक आठवडा होऊनही यातील काही रुग्णांची प्रकृती अजूनही चिंताजनकअसल्याचे सांगण्यात येते. आम्रपाली कालसर्पे (३६) यांचा उपचारादरम्यान ७ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्या ५५ टक्के जळल्या होत्या. त्या पहिल्या दिवसापासून व्हेंटिलेटरवर होत्या. तर, तर रोशनी सुर्यकांत उमाठे (३२) यांचा ८ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. त्या ७५ टक्के जळाल्या होत्या. त्यांच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर होते, पायावर शस्त्रक्रिया करून ‘एक्सटर्नल फिक्सेशन’ करण्यात आले होते. सध्या गंभीर रुग्णांमध्ये सुजाता विनायक रक्षीत (३५) व सीमा विजय धुर्वे (२७ वर्षे) दोन्ही ७० टक्के, ज्योती शामू धुर्वे (२१ वर्षे) ६५ टक्के जळाल्या असून या तीन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते.