
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : केंद्र शासनाद्वारे घरगुती व व्यापारी वापराचे गॅस सिलेंडरचे दर वाढवल्याने या विरोधात काँग्रेसचे संपूर्ण देशभर आयोजित केलेले आंदोलनानिमित्त १२ मार्च रोजी तिरोडा काँग्रेस कार्यालयातून जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, सहकार सेना अध्यक्ष राधेलालजी पटले, माणिक झंजाड, डॉक्टर गिरधर बिसेन, नगरसेवक परमानंद पारधी, रमेश भाऊ टेंभरे, डॉ. निमरोद पटले, शंकरजी बिझांडे, बबलदास रामटेके, लक्ष्मीनारायण दुबे, रामलाल रहांगडाले,संगीता भगत, टिकेश्वरी शहारे ,दुर्गा कटरे , संगीता भगत, यांचेसह काँग्रेस कार्यालयातून गांधी पुतळा येथे जाऊन गांधी पुतळ्यास माल्यार्पण करून तिरडी वर गॅस सिलेंडर ठेवून ‘मोदी है तो मुनकीन है’ गॅस सिलेंडरचे वाढवलेले दर कमी करा, छोटे व्यावसायिक व खाद्यपदार्थ तयार करणाºयांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करा अशा घोषणा देत तहसील कार्यालय ते रोड येथे जाऊन महामहिम राष्ट्रपती यांचे नावे केंद्र शासनाने घरगुती व व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती त्वरित कमी करुन जनसामान्यांना दिलासा द्यावा असे निवेदन तहसीलदार तिरोडा यांना दिले.