माजी खा. दत्ता मेघे यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : ज्येष्ठ राजकीय नेते दत्ता मेघे यांचे रविवारी (२२ मार्च) सायंकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे निकटचे सहकारी आणि नागपूरचे माजी उपमहापौर, रघुनाथ मलिकरे यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांच्या निधनाने राजकीय वतुर्ळात मोठी खळबळ उडाली आहे. दत्ता मेघे हे हिंगणाचे आमदार समीर मेघे आणि माजी विधान परिषद सदस्य सागर मेघे यांचे वडील होते. ते अनेक वर्षे राजकारणात सक्रिय होते आणि त्यांनी विविध पदांवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मेघे हे नागपूर, रामटेक आणि वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस पक्षाचे चार वेळा लोकसभा खासदार होते. त्यांनी २००२ ते २००८ या काळात राज्यसभा सदस्य म्हणूनही काम केले. १९९९ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा ते पक्षात सामील झाले आणि त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *