कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे छोटा हाती वाहन तिरोडा पोलिसांनी केले जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलीस स्टेशनचे शिपाई दमाहे चिरेखनी परिसरात गस्तीवर असताना रस्त्याने जाणारे चार चाकी छोटा हाती वाहनावर संशय आल्याने वाहन थांबवून तपासणी केली असता यात दाटीवाटीने चार जनावरे कोंबून असल्याचे दिसल्यावरून वाहन पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता ही जनावरे कत्तली करता घेऊन जात असल्याचे समजल्यावरून दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कार्यवाही केली. तिरोडा पोलिसांनी दिलेले माहितीनुसार आज दिनांक २२ रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान पोलीस शिपाई शैलेश दमाहे चिरेखणी परिसरात गस्तीवर असताना त्यांना चिरेखनी बस स्टॉप जवळून एक छोटा हाती वाहन क्रमांक एम एच ४३ बीजी ५९०८ वर संशय आल्याने वाहन थांबवून पाहणी केली असता या वाहनात जनावरे दिसून आल्याने वाहन तिरोडा पोलीस स्टेशन येथे आणून तपासणी केली असता या वाहनात चार जनावरे दाटीवाटीने कोंबून चारा पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता कत्तली करता घेऊन जात असल्याची खात्री पटल्यावरुन वाहन चालक प्रदीप बाबूलाल बघेले २८ वर्ष रा.बघोली व जनावर मालक रमेश रतिलाल अंबुले ३५ वर्ष राहणार चांदोली खुर्द यांचे विरोधात प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (१) (ड)(ई) सहकलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम ५,६,९, नुसार गुन्हा नोंद करून चार जनावरे अंदाजे किंमत ४०,००० व ३ लक्ष रुपयाचे वाहन असा एकूण ३ लक्ष ४० हजार रुपयाचा माल जप्त करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दरड पाटील करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *