
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या नियोजित दौºयादरम्यान आयोजित बैठकीत पक्षाचे सहा नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असतानाही स्थानिक पातळीवरची ही अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. विशेष म्हणजे, या घटनेमुळे पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीत अपेक्षित प्रमाणात स्वपक्षीय कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली नाही. उलट, इतर पक्षातील कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे ‘पक्षांतर्गत एकजूट कुठे हरवली?’ असा सवाल राजकीय वतुर्ळातून उपस्थित होत आहे.
लाखनी नगरपंचायतीत सत्ता असतानाही स्थानिक नगरसेवकांचा बैठकीकडे पाठ फिरवणे हे पक्षाच्या संघटनात्मक कमकुवतपणाचे द्योतक मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील विकासकामांसाठी वरिष्ठ पातळीवरून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची भावना नगरसेवकांमध्ये वाढीस लागली आहे. तसेच, स्थानिक पदाधिकाºयांना सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याची नाराजीही दबक्या आवाजात व्यक्त होत आहे. या नाराजीचा परिणाम म्हणूनच सहा नगरसेवकांनी बैठकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघडकीस आले असून नेतृत्वापुढे संघटन सुदृढ करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवरील असंतोष गांभीयार्ने घेतला नाही, तर याचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाखनीतील ही घटना सध्या राजकीय चचेर्चा केंद्रबिंदू ठरली आहे.