एसटी बस ने बाप-लेकाला चिरडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एसटी बस ने दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना भंडारा येथील एसटी डेपोत घडली. या अपघातात दुचाकीवरील बापलेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रोहित खेडकर ३० वर्षे व त्यांचा रौनक खेडकर ३ वर्षे असे अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. ही घटना आज दि.२४ एप्रिल रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास भंडारा एसटी डेपोत घडली. मृतक हे भंडारा शहरातील चांदणी चौक कुंभार टोली येथील रहिवाशी आहेत. मृतक रोहित यांचा आरो प्लांट चा व्यवसाय असून ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात.

रिकामी झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीने भंडारा येथील एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बस क्र.एमएच ४०,वाय ५८७६ ने दुचाकीला धडक देत फरफटत नेले. त्यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती वाºयासारखी पसरताच शहरातील शेकडो नागरिक एसटी डेपो परिसरात जमा झाले होते. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडु नये याकरीता साकोली, कारधा, भंडारा, जवाहर नगर,जिल्हा वाहतुक शाखा,स्थागुशा भंडारा चे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थितीनियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्राप्त माहितीनुसार एसटी बस चालकाने अतिशय वेगात एसटी बस रिव्हर्स घेतल्याने हा अपघात झाला.या अपघातानंतर एसटी डेपोतील एकही कर्मचारी धावुन न आल्याने दोन्ही बापलेकांचा मृतदेह दहा ते पंधरा मिनिटे तिथेच पडुन राहिले. काही वेळानंतर मृतकांचे नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *