
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोसन्मान आवाहन मोहिमेअंतर्गत साकोली तालुक्यात उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांच्या मार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना ५५५१ स्वाक्षरीयुक्त निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात गोमातेला राष्ट्रमातेचा घटनात्मक दर्जा देणे व गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. भारतीय संविधानाच्या कलम ४८ व ५१(अ) च्या भावनेनुसार गायीच्या संरक्षणासाठी एकसंध केंद्रीय कायदा तयार करण्यावर भर देण्यात आला. गोहत्या प्रतिबंध, आर्थिक आत्मनिर्भरता, पायाभूत सुविधा, वैद्यकीय सेवा व चारा-चराई संरक्षण समिती स्थापनेचे मुद्देही मांडले.
ओम संत चंडीचरण पांडे यांनी देशात गोहत्या व गोमांस सेवनावर संपूर्ण बंदीची मागणी करत प्रत्येक घरात गाय पालनाचे आवाहन केले. यावेळी नामदेव बोरकर, हभप गहाणे महाराज, फलहारी महाराज, नगराध्यक्ष देवश्री कापगते, रोहिणी मुंगुलमारे, किशोर पोगळे, नयन पटेल, राजकुमार पोगळे, पुष्कर करंजेकर, मेघा बडवाईक, मिनाबाई लांजेवार, माहेश्वरी नेवारे, प्रीती डोंगरवार, रेणू गणवीर, ताराचंद लंजे, डॉ. वसंत बाळबुद्धे, दिनेश कापगते, कल्पना कापगते, नंदूजी गहाणे, भारती लंजे, शकुंतला कापगते, हेमकृष्ण कापगते, व्यंकटेश येवले, मनीष कापगते, नरेंद्र वाडीभस्मे, जयपाल मानकर, भावेश लांजेवार, अंकित कापगते तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.