वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करा-खा.पटेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमार्णाधीन इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे आणि हे बांधकाम अत्याधुनिक व दर्जेदार असावे, यासाठी खासदार प्रफुल पटेल यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबईत भेट घेऊन उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निमार्णाधिन इमारतीच्या कामे, व्यवस्था आणि उभारण्यात येणाºया आधुनिक सोयी-सुविधांची माहिती घेवून कामे वेळेत पूर्ण करून इमारत गोंदियाकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करा, अशी विनंती मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली. गोंदियासह संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरू पाहणाºया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

मात्र, हे काम केवळ वेळेत पूर्ण होऊन चालणार नाही, तर ते ‘दर्जेदार’ आणि आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असावे, असा आग्रह खासदार प्रफुल पटेल यांनी धरला. यासाठी मुंबई येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत इमारतीचे कामात व्यत्यय किंबहुना थांबणार नाही, याची दक्षता घेऊन ते ठराविक मुदतीत पूर्ण करण्यासाठी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, इमारतीची रचना आणि त्यातील सोयी-सुविधा राष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळतील, यासाठी दर्जेदार कामे करावीत, अशी आग्रहपूर्ण विनंती त्यांनी सभेत केली. याकरीता वैद्यकीय शिक्षण विभागाने संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणेला कामाच्या दजार्बाबत सूचना द्याव्यात, अशीही आग्रही विनंती केली.

बैठकीदरम्यान अधिकाºयांना प्रकल्पाच्या तांत्रिक बाजू आणि निधीच्या वितरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. गोंदियासारख्या नक्षलग्रस्त आणि मागास जिल्ह्यासाठी हे महाविद्यालय वरदान ठरणार आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून, लवकरच गोंदियाकरांना हक्काचे सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध होईल, अशी आशा खा.प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीला गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह आरोग्य विभागातील सचिव, संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *