सामाजिक एकता हिच भारतीय संस्कृतीची खरी ओळख – सुनील फुंडे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : ‘हिंदू-मुस्लीम तसेच सर्व समाज बांधवांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र राहणे हीच काळाची गरज आहे. एकमेकांप्रती आदर, प्रेम व सहकार्य हीच खरी भारतीय संस्कृतीची ओळख आहे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. स्थानिक आशिर्वाद सभागृहात आयोजित ईद मिलन सोहळ्यात बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सामाजिक एकता व बंधुभावावर आधारित प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शन करताना उपस्थितांना भावूक केले. समाजातील गोरगरीब, वंचित व गरजू घटकांची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, त्यातूनच खºया अथार्ने मानवतेचे दर्शन घडते, असे फुंडे यांनी नमूद केले. पुढे त्यांनी सर्वांनी एकजुटीने राष्ट्राच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन करत सामाजिक ऐक्याची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवण्याचा संदेश दिला.

या ईद मिलन सोहळ्यात कौमी एकतेचे सुंदर व प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक व श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देऊन बंधुभाव दृढ केला. कार्यक्रमास माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, नगराध्यक्ष देवश्री कापगते, सामाजिक नेत्या सुचिता आगाशे, आगार व्यवस्थापक सचिन आगरकर, पोलीस उपनिरीक्षक अर्जून बेडवाल, नगरसेवक वैशाली लांजेवार, मेघा बडवा- ईक, नयन पटेल, प्रमोद गजभिये, राजकुमार पोगळे, स्मिता सिडाम, नितीन खेडीकर, त्रिवेणी चौधरी, निर्मला नंदेश्वर, अश्विन नशिने, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप मासुरकर, बसपाचे स्वपनिल गजभिये, जामा मस्जिद कमेटीचे सदर शमीम अन्सारी, हाजी हबीब नजीर शेख, हाजी यासीन कुरैशी, हाजी जमील बेग, हाजी फहीम शेख, आबिद शेख, किशोर चन्ने, अ‍ॅड. मनिष कापगते, राकेश भास्कर, कागदराव रंगारी आदींची उपस्थिती लाभली. मुस्लिम जमात समितीचे शब्बीर पठाण, कलीम शेख, फिरोज खान, अब्बु अलान, मीर खान पठाण, मारूफ शेख, जमिल शेख, राजा खान, गुड्डू शेख यांच्यासह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन हाजी अताऊल्लाह खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन कलीम शेख यांनी मानले. कार्यक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *