मध्यरात्री लागलेल्या आगीत शेतकºयाचे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी देविदास श्रीरंग जांभुळकर यांच्या घराला अचानक आग लागून शेती उपयोगी व वैयक्तिक वापराचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता च्या सुमारास घडली. या आगीत अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घराला आग लागल्याचे लक्षात येताच शेजाºयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घरातील बहुतांश साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या आगीत शेती उपयोगी सुमारे ५० पाईप, औषध फवारणीचे यंत्र, दुचाकी, सायकल तसेच इतर शेतीसाठी लागणारे साहित्य जळून खाक झाले. पीडित शेतकरी देविदास जांभुळकर यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामवासियानी केली आहे

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *