प्रशासनाच्या आश्वासनानंतर मुंढरी येथील आमरण उपोषण १३ व्या दिवशी मागे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज आणि मुंढरी खुर्द येथील रेती घाटातून अवैध वाहतुकीसाठी नैसर्गिक पूर नियंत्रण ‘तोंड्या’ (बाँध) फोडणाºया कंत्राटदारांवर कारवाईसाठी सुरू असलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. २६ एप्रिल २०२६ पासून बेमुदत उपोषणाला बसलेले माजी जिल्हा परिषद सदस्य के.बी. चौरागडे यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर १३ व्या दिवशी, बुधवारी (६ मे), आपले उपोषण मागे घेतले.

महाविकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या मध्यस्थीने आणि तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी दिलेल्या ठोस कारवाईच्या खात्रीनंतर हे आंदोलन संपुष्टात आले. मुंढरी बुज परिसरातील रेती घाटाच्या लिलावानंतर, कंत्राटदाराने रेतीची वाहतूक सुलभ करण्यासाठी नदीपात्रातील नैसर्गिक पूर संरक्षक टोंड्या फोडून रस्ता तयार केला होता. यामुळे पावसाळ्यात वैनगंगा नदीचे पाणी थेट गावात शिरून महापुराचे संकट ओढवण्याची भीती निर्माणझाली होती. या संदर्भात १७ एप्रिलपासून तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने, २६ एप्रिलपासून के.बी. चौरागडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *