आंतरराज्यीय गांजा तस्करी टोळीचा पर्दाफाश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली असून, ओडिशातून गांजा आणून विक्री करणाºया आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत ३ महिला आणि २ पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ११ किलो गांजा, आॅटो आणि मोबाईलसह एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काही महिला ओडिशा राज्यातून गांजा घेऊन येत आहेत आणि बल्लारपूर येथील पुरुष सहकाºयांसह आॅटोने राजुरा येथे विक्रीसाठी जात आहेत अशा माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूरराजुरा-सास्ती मार्गावर सापळा रचून संशयास्पद आॅटो क्रमांक एमएच ३४, बिएच १६२६ थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये बसलेल्या महिलांच्या पिशव्यांमध्ये ११ किलो अवैध गांजा आढळून आला. या प्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून गुन्हयात ११ किलो गांजा, एक आॅटो, मोबाईल संच असा एकूण किंमत २ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आॅटो चालक मोहम्मद युनुस अली उर्फ बादशाह, लालचंद गणेश केसकर, उमा हामु नुनावत (५०, रा. मुळगु, जि. वरंगल, तेलंगणा), ललिता आकाश दामले (२४, रा. ईटारसी, मध्यप्रदेश), आरती गुलाब परते (२८, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात ओडिशातील मुनीगडा येथील मुख्य पुरवठादार इंद्रजित पाराससेठ आणि रामबाबू यांची नावे निष्पन्न झाली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास बल्लारशा पोलिस करीत आहेत

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *